
सिल्लोड : सस्तन निशाचर पक्षी वटवाघळांबद्दल जनमानसांत अवास्तव भीती आहे. परंतु, निसर्गाच्या अन्नसाखळीत हे पक्षी महत्त्वाची भूमिका बजावतात. सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पाजवळ जगातील आकाराने सर्वांत मोठ्या असणाऱ्या ‘फ्लाइंग फॉक्स फ्रूट बॅट’ या प्रजातीच्या सुमारे १० हजार वटवाघळांची वस्ती आहे.