Crime Branch : दरोडेखोर हाजबेकडून आणखी ११ लाखांचे सोने जप्त; उर्वरित सोने जवळच्या व्यक्तीकडे लपविल्याचा संशय
Santosh Ladda Robbery : संतोष लढ्ढा यांच्या घरावरील ३.५ कोटींच्या दरोड्यातील मुख्य आरोपी योगेश हाजबे याच्याकडून ११ लाखांचे १३ तोळे सोनं जप्त करण्यात आले आहे. मृत अमोल खोतकर यांच्या मैत्रिणीने सोनं दुसऱ्या व्यक्तीकडे सुपूर्द केल्याची माहिती पोलिसांना दिली असून, उर्वरित सोन्यासाठी चौकशी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लढ्ढा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात गुन्हे शाखेने अटकेत असलेला दुसरा मुख्य आरोपी योगेश हाजबे याच्याकडून आणखी ११ लाखांचे तेरा तोळे सोने जप्त केले आहे.