Neurofibroma : बारा वर्षांची मुलगी झाली न्युरोफायब्रोमामुक्त ; लायन्सच्या शिबिरात २८ जणांवर मोफत प्लॅस्टिक सर्जरी
Plastic Surgery : दहा ते बारा वर्षांची मुलगी जन्मजात न्युरोफायब्रोमा या आजाराने ग्रस्त होती. लायन्स क्लबच्या शिबिरात तिच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तिचे गाल सामान्य मुलांसारखे होणार, परिणामी तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : दहा ते बारा वर्षांची मुलगी जन्मजात ‘न्युरोफायब्रोमा’ आजाराने ग्रस्त होती. या आजारामुळे तिचे गाल फुगल्यासारखे दिसायचे. शनिवारी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुमारे दोन महिन्यांत तिचे गाल सर्वसामान्य मुलांसारखे होतील.