Education News : पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठातच पडून; १२१ महाविद्यालयांना खुलासा करण्याचे आदेश
University Convocation : मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी पदवी प्रमाणपत्रे नेलेली नाहीत. अशा १२१ महाविद्यालयांना खुलासा मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होऊन दोन महिने झाले. ४७६ पैकी १७६ महाविद्यालयांनी परीक्षा भवनातून पदवी प्रमाणपत्रे वितरणासाठी नेलेली नाहीत.