कन्नड : कन्नड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी न्यायाधीश व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेत लोकअदालतीचे आयोजन केले होते. या लोकअदालतीमध्ये १२९० वादप्रकरणात एक कोटी रुपयांची करवसुली करण्यात आली..विद्युत महावितरण, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपरिषद बीएसएनएल दूर संचार विभाग व इतर संस्थांच्या जुन्या प्रकरणांसह न्यायालयातील प्रमुख प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकदालतीसाठी नगरपरिषद व ग्रामपंचायतीच्या विविध थकीत कर्जदारांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते..वर्षानुवर्षे कर थकवणाऱ्या नगरपरिषदेच्या २१ हजार करथकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी २४३ नागरिकांनी १६ लाख ८८ हजार ४७७ रुपयाचा कर भरणा केला. तालुक्यातील १३८ ग्रामपंचायतींच्या १०४२ कर थकविणाऱ्या नागरिकांनी २५ लाख ४१ हजार ७९८ रुपयांचा कर भरणा केला..Tur Purchase : नाफेडच्या प्रतीक्षेतील तूर चालली गुजरातला.महावितरणच्या ३० विद्युत ग्राहकांनी १२५०० रुपयांचा कर भरणा केला. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही. डी. पाटील, न्यायाधीश ए.आय. औटी, न्यायाधिश व्ही.एन. काटकर, कन्नड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंत शेजवळ, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे, सहायक गटविकास अधिकारी संतोष दारकुंडे, विस्तार अधिकारी एम. एफ शेख, एच. एल बांगर, अॕड. कृष्णा जाधव आदींसह वकील संघाचे सदस्य, पदाधिकारी, नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.