Crime : धक्कादायक घटना! 14 वर्षीय मुलीला दारू पाजली; डोंगरावर नेत 6 जणांकडून आळीपाळीने अत्याचार

सहा आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Crime
CrimeSakal

छत्रपती संभाजीनगर : १४ वर्षीय मुलीला बळजबरीने दारु पाजून डोंगर परिसरात तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींपैकी तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली, तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश अतुल उबाळे यांनी शुक्रवारी (ता.९) दिले. या प्रकरणात दोघा विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले.

Crime
Video : 'राधा तेरी चुनरी'वर युवतीचा भन्नाट डान्स; हॉलमध्ये केला माहोल

अक्षय प्रकाश चव्हाण (१९, रा. डोणगाव तांडा ता. पैठण), शेख बबलु शेख लतिफ उर्फ असीम पठाण (एचपी) (२४, रा. जमालनगर, देवळाई) आणि रामेश्वर अंबादास गायकवाड (२२, रा. अलोकनगर, बीड बायपास सातारा परिसर, मुळ रा. मानेगाव खालसा, रामनगर, जि. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

विशेष म्हणजे अटकेतील आरोपींचे मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. प्रकरणात १४ वर्षीय पीडितेच्या फिर्यादीनुसार, मैत्रिणीने पीडितेची अल्पवयीन आरोपीसोबत ओळख करून दिली. त्याने दुसऱ्या एका तरुणाशी पीडितेची ओळख करून दिली. ते दोघेही पीडितेशी मोबाइलवरून बोलायचे.

ऑक्टोबर २०२२ मध्ये अल्पवयीन मुलाने पहाटे दोनला पीडितेला कॉल केला. तिला घराबाहेर बोलावून घेतले. तेव्हा आरोपी अक्षय चव्हाण आणि अल्पवयीन मुलगा तेथे होते. त्यांनी पीडितेला साई टेकडी परिसरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ बनविला. अश्लील फोटो काढले.

पहाटे ५ वाजता तिला घरी आणून सोडले. त्यानंतर पुन्हा अल्पवयीन आरोपीने तिला धमकी देऊन साई टेकडी परिसरात नेले व तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. हा प्रकार तीन ते चारवेळा घडला.

मार्च-एप्रिल २०२३ मध्ये असीम पठाण (एचपी) याने अशाच प्रकारे पहाटे दीड वाजता फोन करून बोलावले आणि देवळाई रोडच्या बाजुला असलेल्या एका घरी नेऊन अत्याचार केला. दुसऱ्या वेळी त्याने त्याच्या मित्राला सोबत घेऊन दोघांनी अत्याचार केला. त्यानंतर राम गायकवाड याने आणि त्याच्या मित्राने बळजबरी अत्याचार केले.

त्यानंतर पुन्हा एकदा राम गायकवाड याने पीडितेवर अत्याचार केला. अल्पवयीन मुलांसह तब्बल सहा जणांनी पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केले. प्रकरणात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात सुनावणीदरम्यान सरकारी वकील बी. आर. लोया यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com