दोन वर्षांची मुदत संपली, तरी

दोन वर्षांची मुदत संपली, तरी
Published on: 
१४५ गावांमधील फीडर सेपरेशनचे काम रखडले गंगाखेड, ता. ३० (बातमीदार) : ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने गंगाखेड विधानसभा मतदारसंघात कृषिपंप आणि गावठाण फीडर सेपरेशनचे काम हाती घेण्यात आले. मात्र, अनेक गावांतील कामे अद्याप अपूर्ण आहेत. कामासाठी दिलेली दोन वर्षांची मुदत संपूनही २८४ पैकी १४५ गावांतील कामे प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यांचा मतदारसंघात समावेश आहे. गंगाखेड तालुक्यातील १०५ गावांपैकी ७०, पालम तालुक्यातील ८४ गावांपैकी ५७, तर पूर्णा तालुक्यातील ९५ गावांपैकी १८ गावांतील फिडर सेपरेशनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या योजनेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोचलेला नाही. शेतीसाठी वेळेवर वीज मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे पिकांना पाणी देण्याचे नियोजन विस्कळित होत आहे. आधीच विविध संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत. दोन वर्षांची मुदत संपूनही कामे अपूर्ण असल्याने संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ----- काम रखडण्याची कारणे सबठेकेदारांना वेळेत पैसे मिळत नसल्याने काम थांबवले जाते. विद्युत खांब आणि फीडर शेतात उभारण्यास काही शेतकऱ्यांचा विरोध, कामाच्या वेळी साहित्याची कमतरता तसेच रस्त्यांच्या कामांमुळे विद्युत केबल तुटण्याच्या घटनांमुळेही कामात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.