Chh. Sambhajinagar: मोबाईल घेऊन न दिल्याने रागाच्या भरात युवकाची टोकाची कृती; डोंगरावरून उडी घेतली अन्...
Mobile Phone Addiction: मोबाइल न मिळाल्याच्या कारणावरून पोलिस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाने खवड्या डोंगरावरून उडी घेऊन जीवन संपवल. अथर्व तायडे (१६) या युवकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल घेऊन दिला नाही या कारणावरून युवकाने थेट खवड्या डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. तीन) दुपारी उघडकीस आली. अथर्व गोपाल तायडे (वय १६, रा. मूळ जळगाव जामोद, जि. बुलडाणा) असे मृताचे नाव आहे.