Chh. Sambhajinagar Crime: स्वयंपाक येत नाही म्हणून लेकीस चटके; रांजणगाव शेणपुंजीत आई-वडिलांविरोधात तक्रार
Crime News: स्वयंपाक नीट येत नाही म्हणून आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षीय मुलीला चटके देऊन, मारहाण करून बाथरूममध्ये डांबून ठेवले. या अमानुष छळामुळे त्रस्त होऊन पीडितेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगर: स्वयंपाक येत नाही म्हणून चक्क पोटच्या लेकीस चटके देण्याचा अमानुष प्रकार रांजणगाव शेणपुंजी परिसरात उघडकीस आला. या छळाला कंटाळून मुलीने आई-वडिलांविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.