esakal | परीक्षेत मार्क कमी पडल्याने १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या

बोलून बातमी शोधा

aurangabad
परीक्षेत मार्क कमी पडल्याने १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या
sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : बी फार्मसी परीक्षेमध्ये गुण कमी पडल्यामुळे निराश झालेल्या १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार औरंगपुरा परिसरातील श्रीरंग बिल्डिंगमध्ये सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.

औरंगपुरा येथील कीर्ती उदय जोशी ही बी फार्मसीची तयारी करत होती. समाधानकारक मार्क न मिळाल्याने ती नैराश्यात होती. गुरुवारी दुपारी ती अभ्यासाच्या खोलीमध्ये गेली व पंख्याला गळफास घेतला.

हेही वाचा: 'जिल्हाधिकारी डॉ. विखेंना पाठीशी घालत आहेत का?'

याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यांमध्ये अकस्मात नोंद करण्यात आली. तिने तीन पानाची सुसाईड नोट मृत्युपूर्वी लिहून ठेवली असून, आपण परीक्षेत यशस्वी होऊ शकलो नाही म्हणून आत्महत्या करत आहे. आपल्या मृत्यूस कुणाला जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.