Chh. Sambhajinagar Power Supply : छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील अडीचशे कोटींच्या थकबाकीसाठी महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. २,५०० पेक्षा अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिमंडल म्हणजेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना अशा दोन जिल्ह्यांत तब्बल अडीचशे कोटींच्या थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. वाढत्या थकबाकीच्या अनुषंगाने महावितरणने धडक वसुली मोहीम सुरू केली.