
पैठण : श्री संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी बनविण्यात येत असलेल्या चांदीच्या रथाकरिता पैठण येथील संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे तीन किलो चांदी नाथचरणी अर्पण करण्यात आली. हा चांदीचा रथ नाथांच्या पादुका पंढरपूरला आषाढी एकादशी वारीला घेऊन जाणार आहे.