औरंगाबाद शहरात दोन दिवसात तब्बल ३० पॉझिटिव्ह

एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे.
Corona Patients
Corona PatientsSakal
Updated on
Summary

एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग (Corona Infection) पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल ३० रुग्ण पॉझिटिव्ह (Positive) आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता या आकड्यामुळे आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे.

शहरात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सुमारे ३२ हजार तर दुसऱ्या लाटेत ४० हजार जणांना कोरोना संसर्गाची बाधा झाली होती. यातील १९७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याएवढी होती. त्यात नोव्हेंबर महिन्यापासून ओमीक्रॉन विषाणू समोर आला. त्यानंतर तिसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली जात आहे.

Corona Patients
बीडवासियांचं रेल्वेचं स्वप्न पूर्ण! गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून धावली ट्रेन

शहरात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले असले तरी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. पण थंडी वाढताच गेल्या मागील चार दिवसापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (ता. २९) १५ व गुरूवारी (ता.३०) १५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांनी नवीन वर्षे घरातच कुटुंबासमवेत साजरे करावे, असे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Marathi News Esakal
www.esakal.com