Robbery Crime : बजाजनगरमधील उच्चभ्रू वसाहतीत उद्योजकाच्या बंगल्यावर मध्यरात्री सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून केअरटेकरला मारहाण केली. पिस्तूल रोखून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी व रोख रक्कम असा ३ कोटींपेक्षा अधिक ऐवज लुटला.
बजाजनगर : बजाजनगरातील उच्चभ्रू वसाहतीत उद्योजकाच्या बंगल्यात दरोडेखोरांनी दोन तास धुमाकूळ घातला. सहा दरोडेखोरांनी केअरटेकरला मारहाण करून त्याच्या छातीवर पिस्तूल रोखले.