
खुलताबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे कल्याणकारी स्वराज्य निर्माण केले. त्याचा अधिकृतरीत्या रायगडावर राज्याभिषेक सोहळा झाला. त्याला शुक्रवारी (ता. सहा) ३५१ वर्षे पूर्ण झाली. वेरूळ येथे मालोजीराजे भोसले गढीवर आज राज्याभिषेक सोहळा थाटात, उत्साहात साजरा करण्यात आला.