
औसा : घराच्या बांधकामासाठी शेतमाल आणि सोन्याचे दागिने विकून आलेले पाच लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून इलेक्ट्रिक समान घेण्यासाठी गेलेल्या एका सेवा निवृत्त मुख्याध्यापकाचे डिक्कीत ठेवलेले पाच लाख रुपये चोरट्यानी लंपास केल्याची घटना औसा शहरात मंगळवारी (ता.१) रोजी दुपारी घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेचा गुन्हा औसा पोलिसात रात्री उशिरा दाखल झाला आहे.