
छत्रपती संभाजीनगर: विद्यार्थ्यांच्या सायकली शाळांच्या पार्किंग, क्लासेस, घर परिसरातून चोरी करायचा आणि अवघ्या पाचशे, हजारांत विकून तो जुगार खेळायचा, त्यातून नशाही करायचा! त्याला सिडको पोलिसांनी ३० जुलै रोजीच पकडले. लक्ष्मण भीमराव गायके (वय ६०, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे त्या चोरट्याचे नाव आहे. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली.