

छत्रपती संभाजीनगर : एका ६५ वर्षीय महिलेला अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान झाले. मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारत ॲडव्हान्स स्टेजपर्यंत पसरलेल्या कर्करोगाचा भाग काढून पोटात हायपरथर्मिक इंट्रापेरिटोनियल किमोथेरपी (हायपेक) दिली. आता पुन्हा हा कर्करोग परतण्याची शक्यता कमी असल्याचे ऑन्कोसर्जन डॉ. आनंद कर्नावत यांनी सांगितले.