Aurangpura Fireworks Market Fire 2016 : अजूनही येतात शहरवासीयांच्या अंगावर शहारे!

औरंगपुरा फटाका मार्केटच्या अग्नितांडवाला ७ वर्षे पूर्ण ः १४० दुकाने झाली होती खाक
7 years of aurangpura fireworks market fire accident 140 shops were gutted
7 years of aurangpura fireworks market fire accident 140 shops were guttedsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : २8 ऑक्टोबर २०१६ हा दिवस शहरवासीयांच्या अंगावर काटा आणणारा ठरला होता. याच दिवशी औरंगापुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाका मार्केटमधील १४० दुकानांना आग लागून शहरातील सर्वात मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेला परिसरातील रहिवासी अद्यापही विसरले नसून ही घटना आठवताच अंगावर शहारे येत असल्याचे नागरिक सांगतात.

औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षी फटका मार्केट असोसिएशनच्यावतीने दुकाने थाटण्यात येतात. २०१६ साली या मैदानावर तब्बल १४० दुकाने थाटण्यात आली होती. या मैदानाला लागूनच स्वातंत्र्यसैनिक कॉलनी ही नागरी वसाहत आहे.

२९ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी अकराच्या सुमारास अचानक दुकान क्रमांक ४६ मध्ये ठिणग्या उडून आग लागली. काही वेळातच या आगीने इतर दुकानांना विळख्यात घेतले. अवघ्या काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. संपूर्ण १४० दुकानांना आग लागून सर्वत्र फक्त फटक्याचे कर्णकर्कश्‍श आवाज आणि धुराचे साम्राज्य पसरले होते.

१० कोटींचे नुकसान

हे अग्नितांडव दीड तास सुरु होते. आगीत दुकानातील माल, ८८ दुचाकी, १३ चारचाकी वाहने जळाली होती. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नसली तरी १० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. पोलीस आणि महसूल विभागाने याचा पंचनामा केला होता.

४ आरोपी अटकेत, ९५० पानांचे चार्जशीट

तत्कालीन पोलीस आयुक्त यांनी आगीचे हे प्रकरण गांभीर्याने घेतले होते. गुन्हे शाखेकडे याचा तपास सोपवण्यात आला होता. तपासामध्ये सिगारेटच्या थोटकामुळे आग लागल्याचे समोर आले होते. ज्या दुकानापासून आगीला सुरुवात झाली, त्या दुकानदारासह फटाका असोसिएशनच्या ३ पदाधिकाऱ्यांना देखील निष्कळजीपणाचा ठपका ठेवत अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शखेने तब्बल ९५० पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

शहर धावले होते मदतीला

या आगीचे लोळ आणि धुराचे लोट सुमारे १५ किलोमीटर अंतरावरून पण दिसत होते. आगीमुळे स्वातंत्र्यसैनिक कॉलनी हादरून गेली होती. अग्निशमन दलाचे १५ बंब, १०० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. अवघे शहर मदतीला धावले होते. आज ही घटना आठवली तर अंगावर काटा येत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

या आगीच्या तपासासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमले होते. या मध्ये तपास करून ४ आरोपीना अटक करून ९५० पानाचे चार्जशीट कोर्टात दाखल केले आहे. अद्याप हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

- अनिल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, तत्कालीन तपास अधिकारी

सकाळी ११ वाजेची वेळ असेल, अचानक फटाका मार्केटमध्ये धावपळ सुरु झाली. आग लागल्याचे कळताच मदतीसाठी धावत गेलो. कॉलनीतील अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. नुकसान खूप झाले मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

- दीपक क्षीरसागर, प्रत्यक्षदर्शी

घरच्या मागील बाजूला असलेल्या मैदानावर आग लागल्याने संपूर्ण कॉलनीत मोठ्या प्रमाणात भीती पसरली होती. मैदानाला लागून असलेल्या घरातील ज्येष्ठ नागरिकांना हलवले होते. आग आटोक्यात येईपर्यंत मनात भीती कायम होती.

- राजेश खराड पाटील, प्रत्यक्षदर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com