
संतोष निकम
कन्नड : ‘वावडी माईती पाणी भरेर ई तो हामनेन अन हमार नशिबेम जल्मेती लको ह्योछ. एक भांडा पाणी भरेपुरता चार वाजेती छिचीयारून बरोबर ले जाणू पडच. मरेर ठकाण वावडीप ले जाणू पडच साहेब...’ म्हणजे, विहिरीतून पाणी शेंदून आणणे आमच्या पाचवीलाच पुजलेले आहे. हंडाभर पाण्यासाठी पहाटे चार वाजता जीवघेण्या विहिरीवर लेकराबाळांना सोबत घेऊन जावे लागते साहेब... अशा भावना आहेत कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील महिलांच्या.