

female bouncers Beed
sakal
बीड : जमिनीच्या वादातून पेटलेला संघर्ष आता थेट ‘हाय-प्रोफाइल’ सुरक्षेपर्यंत पोहोचला आहे. तहसील कार्यालयासमोर झालेल्या धक्कादायक मारहाणीच्या घटनेनंतर शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच्या सुरक्षेसाठी चक्क महिला बाऊन्सर्सची फौज उभी केली आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच एखाद्या पुरुषाच्या सुरक्षेसाठी महिला बाऊन्सर्स तैनात झाल्याने शहरभर चर्चा रंगली आहे.