

छत्रपती संभाजीनगर : कौटुंबिक न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २० प्रकरणांची तडजोड होऊन १५ जोडपी पुन्हा नांदण्यास एकत्र गेली. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये कौटुंबिक न्यायालयात एकूण ४३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. दोन्ही बाजूंनी २४ जोडपी हजर राहिली. २० प्रकरणांमध्ये तडजोड झाली. १९ प्रकरणांमध्ये पक्षकार गैरहजर होते.
समाजात कौटुंबिक कलह वाढत असून अशा परिस्थितीत लोकअदालतीचे पॅनेल क्रमांक १६ चे सदस्य, कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक व कर्मचारी यांनी परिश्रम घेत १५ जोडप्यांना पुन्हा एकत्र आणले. पॅनेल क्रमांक १६ वर जिल्हा न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांनी पॅनेलप्रमुख, विधिज्ञ हरिभाऊ पवार यांनी पॅनेल सदस्य, समुपदेशक भारत काळे व मनीषा कांदे यांनी सहकार्य केले. या पॅनेलमध्ये कामगार न्यायालय, सहकार अपिलेट न्यायालय, जिल्हा ग्राहक मंच यांचीही प्रकरणे ठेवण्यात आली होती.
यापैकी २० प्रकरणात तडजोडीने मिटवून ५८ लाख ९८४ रुपये एवढी रक्कम अर्जदारांना देण्याचे आदेश पारित करण्यात आले. प्रमुख न्यायाधीश आय. जे. नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत संपन्न झाली. प्रबंधक अनिल जाधव, प्रभारी अधीक्षक अमोल खोत व कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी लोकअदालतसाठी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.