
भगवान हिम्मतराव सदावर्ते हे स्पर्धा परीक्षेचे उमेदवार ही बिना छताची शाळा चालवतात. आपण या मुलांसाठी काही करायला हवे या ध्यासाने ते थेट कामाला लागले. या शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या विना छताची शाळा तरुणांमध्ये आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये चर्चेची ठरत आहे.