

Paithan Accident News
sakal
आडूळ : भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.२०) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास अब्दुल्लापूर तांडा (ता. पैठण) येथे घडली.
या अपघाता विषयी पाचोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गणेश राठोड वय २५ वर्षे, राहणार अब्दुलापूर तांडा (ता. पैठण ) हा तरूण त्यांच्या शेतातुन दुचाकी क्रमांक एम एच २० एच एल ३२५० ने घरी येत होता नेमके त्याच वेळी आडूळ कडून बालानगरकडे भरधाव वेगाने जाणारा टेम्पो क्रमांक एम एच २० ई जी ९३८३ ने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला होता.