औरंगाबाद : पावसाची धास्ती; उन्हाळी बाजरी काढणीला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaurangabad farmer Accelerate summer millet harvest

औरंगाबाद : पावसाची धास्ती; उन्हाळी बाजरी काढणीला वेग

पाचोड : रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा व गहू आदी पिकांची सोंगणी होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तोच उन्हाळी मशागती सोबत उन्हाळी बाजरी व सोयाबीन सोंगणीच्या कामास प्रारंभ झाला. खरीप पेरणी तोंडावर ढगाळ वातावरण निर्माणामुळे उन्हाळी पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. पाचोडसह परिसरात यंत्राद्वारे (हार्वेस्टर) बाजरी काढ सुरु असून इंधन दरवाढीचा यंदा प्रति एकरी पाचशे रुपयाचा अतिरिक्त भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे.

गत वर्षी पैठण तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने सर्व नदीनाले, विहिरी तुडुंब भरून गव्हासह ज्वारीचे क्षेत्र कमालीचे वाढले, एवढेच नव्हे तर खरीप, रब्बी सह विहिरीस मुबलकपणे पाणी टिकल्याने उन्हाळ्यातही शेतकऱ्यांनी अनेक पिके घेतली. त्यांत सोयाबिनसह बाजरींस विशेष पसंती मिळाली. शेतकऱ्यांनी बाजरीची चांगली निगा राखल्याने अपेक्षित उत्पन्न पदरात पडण्याची आशा उंचावली जात आहे.

त्या सोबतच यंदा पाचोड परिसरातील प्रत्येक शेतकऱ्यांनी थोडेफार का होत नाही बाजरी सोबत जनावरांच्या चारा - वैरणीची व्यवस्था म्हणून मकाचीही पेर साधली असून आता बाजरी, सोयाबीन व मका पिकाच्या काढणीस सुरुवात झाल्याने मजूरटंचाई निर्माण झाली. त्यातच अधुन मधून ढगाळ वातावरण निर्माण होऊन सर्वत्र खरीप पेरणीपूर्व मशागतीची लगीनघाई सुरु होऊन मजुरांनी ३०० वरून ३५० रुपये रोजंदारीचा भाव वाढविला.

Web Title: Aaurangabad Farmer Accelerate Summer Millet Harvest

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top