
पृथा वीर
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ल्यापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या अब्दीमंडी गावातील जैन शिल्प रस्त्याशेजारी पडून आहेत. ‘सकाळ’ने याविषयी एप्रिल महिन्यात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या भागाची पाहणी करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, तीन महिने उलटूनही ही शिल्पे त्याच जागेवर असून आसपास गवत वाढले आहे.