वाचन प्रेरणा दिन

वाचन प्रेरणा दिन
Published on: 
सामूहिक पुस्तक वाचन, प्रदर्शनातून ‘मिसाईल मॅन’ला अभिवादन धाराशिव, ता. १६ (बातमीदार) ः माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सामूहिक पुस्तक वाचन, प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ------- श्रीपतराव भोसले विद्यालय श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सामूहिक मूकवाचन, पुस्तक प्रदर्शन व विद्यार्थी मनोगत अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कला, वाणिज्य विभागप्रमुख कैलास कोरके अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अमितकुमार काकडे यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक मूकवाचन केले. विद्यालयाच्या ग्रंथालयात पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी शरद पाटील पाटील, एम. एस. वाडकर यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाधिकारी डी. वाय. घोडके यांनी सूत्रसंचालन केले. ---------- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या संकल्पनेतून रीडिंग रिफ्लेक्शन या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य डॉ. माने, ॲकॅडमिक डीन डॉ. डी. डी. दाते, कार्यक्रमाच्या संयोजक प्रा. सुनीता गुंजाळ, बेसिक सायन्स ॲन्ड हुमानिटीच्या विभागप्रमुख डॉ. उषा वडणे, प्रा. वर्षा बोंदर, प्रा. मनीषा वाकुरे, प्रा. वर्षा पाटील, प्रा. मयूरी तांबे, सहायक ग्रंथपाल बिभीषण सिरसट, सविता नलावडे, सूक्ष्मा टेकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी ग्रंथालय कर्मचारी संभाजी धतुरे, सुनीता कुंभार, अजमेर मुलानी यांनी पुढाकार घेतला. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. ------ आश्रमशाळा बावी. बावी (ता. धाराशिव) येथील आश्रमशाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पर्यवेक्षक एन. बी. जाधव अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. व्ही. टी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य दयानंद राठोड, मुख्याध्यापक टी. ए. फुटाणे, एस. एम. अनमुलवाड उपस्थित होते. प्रा. अमोल शिंपी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर भाषणे सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com