Abdul Sattar : सत्तार नाहीच ! बेलगाम वक्तव्ये आणि वादग्रस्त प्रकरणे नडली
Maharashtra politics : अब्दुल सत्तार यांना वादग्रस्त विधाने आणि प्रकरणांमुळे मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यांना सध्या अन्य पर्याय नसून, ते भविष्यात योग्य संधीची वाट पाहतील. शिवसेनेतून अंतर्गत विरोध, तर भाजपचाही होता रेड सिग्नल.
छत्रपती संभाजीनगर : विरोधक, स्वपक्षीय आणि मित्रपक्षांच्या नेत्यांबाबत केलेली बेलगाम विधाने आणि मंत्रिपदाच्या काळातील वादग्रस्त प्रकरणे यामुळे कसेबसे निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद नाकारत दूर ठेवण्यात आले.