Sambhaji Nagar : सत्तार म्हणाले, ‘मी पक्का राजकारणी!’ ; हज हाउसच्या लोकार्पणात मिश्कीलपणे उलगडले स्व-व्यक्तिमत्त्व

मी मंदिराचा पुजारी नाही. मशिदीचा पेशइमामही नाही. पक्का राजकारणी आहे. मी खूप छोटा माणूस आहे, बोलण्यास घाबरत नाही. मी अशी चावी आहे, जी कुठल्याही कुलपाला लागते. कुणाच्या पोटात काय, कुणाच्या ओठात काय अन् बटण दाबणाऱ्या बोटात काय याचा अंदाज सहज लावतो, असे मंत्री अब्दूल सत्तार यांनी सांगत खळखळून हसवले. निमित्त होते ते शुक्रवारी झालेल्या हज हाउसच्या लोकार्पणाचे.
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : मी मंदिराचा पुजारी नाही. मशिदीचा पेशइमामही नाही. पक्का राजकारणी आहे. मी खूप छोटा माणूस आहे, बोलण्यास घाबरत नाही. मी अशी चावी आहे, जी कुठल्याही कुलपाला लागते. कुणाच्या पोटात काय, कुणाच्या ओठात काय अन् बटण दाबणाऱ्या बोटात काय याचा अंदाज सहज लावतो, असे मंत्री अब्दूल सत्तार यांनी सांगत खळखळून हसवले. निमित्त होते ते शुक्रवारी झालेल्या हज हाउसच्या लोकार्पणाचे.

सत्तार म्हणाले, मी ज्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतो, तिथे ३ लाख २० हजार हिंदू आणि ६० हजार मुस्लिम मतदार आहेत. माझ्या विरोधात कायम एक हिंदू आणि दोन मुस्लिम उभे राहतात; तरीही मी पंचवीस-तीस हजार मतांनी जमवूनच घेतो. ज्या शहरात हातगाडी ओढली त्या शहरात आता हेलिकॉप्टरमधून उतरतो. आयएएस अन् आयपीएस अधिकारी मला सॅल्यूट करतात. एकदा खासदार व्हावे म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे गेलो. पण, तिकीट मिळाले नाही पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही. कुणाची हाजीहाजी करणे मला जमत नाही. मी कुठल्याही पार्टीत असलो तरीही मला काहीही फरक पडत नाही. म्हणूनच तर काँग्रेसला सोडून इम्तियाज जलील यांना खासदार केले.

संभाजीनगरात होणार अल्पसंख्याक आयुक्तालय

राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरात होणार आहे. नव्याने होणाऱ्या प्रशासकीय इमारतीत या मुख्यालयासह मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आणि वक्फ बोर्डाचे कार्यालय राहील, असा आशावाद वक्फ मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. शहरातील हज हाउसचे लोकार्पण शुक्रवारी अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, हरिभाऊ बागडे, उदयसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.

sambhaji nagar
Sambhaji Nagar : रेल्वेचा प्रवास होणार विनाअडथळा ; संभाजीनगर-अंकाई मार्गाचे दुहेरीकरण ३० महिन्यांत

शिकलो नाही; पण भल्याभल्यांना शिकवतो

सत्तार म्हणाले, मला सभागृहात तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भाषण करू दिले; कारण मी मोठा होईल ही भीती त्यांना होती; त्यामुळे माझ्याऐवजी त्यांनी तत्कालीन आमदार इम्तियाज जलील यांना संधी दिली. त्यावर मी बागडे यांना खूप त्रास दिला. नंतर त्यांची माफीही मागितली. काहीच नाही जमले तर कादरखान होऊन काम करून घ्यावे लागते. मी शिकलो नाही. पण, भल्याभल्यांना शिकवतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, खासदार इम्तियाज यांनी बोलताना छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाहून थेट उमरा जाण्यासाठीची व्यवस्था झाली तर शहराच्या विकासात भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com