Accident news : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोन सख्‍ख्या भावांचा मृत्यू

सिल्लोडच्या टिपू सुलतान चौकालगतची घटना
Accident News
Accident News esakal

सिल्लोड : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. शहरातील वळण रस्त्यावरील टिपू सुलतान चौकालगत हा अपघात घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितेश ज्ञानेश्वर कळम (वय १८) व त्यांचा लहान भाऊ रूपेश ज्ञानेश्वर कळम (वय १०) रा.भवन (माणिकनगर) ता.सिल्लोड हे दुचाकीने (एमएच २०,डीपी ६१७३) वरून भवनकडे जात असताना जळगावकडून येणाऱ्या ट्रकने (एमएच २०, ईजी ९४९५) दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दोघा जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. शहर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. शनिवारी (ता.२२) दोन्ही मृतांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अपघातामध्ये मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबाचा हॉटेलचा व्यवसाय असून, दोन्ही भाऊ कामानिमित्त सिल्लोड येथे आले होते. दोन्ही मुलांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com