esakal | अपघात झाला अन् वाहने सोडून फरार झाले
sakal

बोलून बातमी शोधा

accident

अपघात झाला अन् वाहने सोडून फरार झाले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अजिंठा : वाहनांमध्ये कत्तलीसाठी निर्दयीपणे पाळीव जनावरे घेऊन जात असताना वाहनाला अपघात झाल्याने वाहनांसह जनावरे घटनास्थळी सोडून सदर व्यक्तींनी पळ काढल्याची घटना धोत्रा येथील शिवना-दिग्रस रस्त्यावरील चौफुलीवर घडली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी पहाटे मौजे धोत्रा येथे अज्ञात व्यक्ती महिंद्रा कार (एम.एच.१९ बीजे-१२५१) मध्ये एक गाय एक गोरा तसेच दोन वासरे घेऊन कारमध्ये जात असताना असताना चौफुलीवर अपघात झाला. (Aurangabad News)

हेही वाचा: औरंगाबाद : परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

बाजूच्या मंदिरातील लोकांच्या लक्षात ही बाब आल्याने सदरील व्यक्तींनी कार व पाळीव जनावरे तेथेच सोडून पळ काढला. नंतर धोत्रा येथील पोलिस पाटलांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच गस्तीवर असलेले फौजदार श्री. पवार, सहकारी प्रदीप बेदरकर हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी सदर कार ताब्यात घेऊन जनावरे गोशाळेत पाठवली. पाळीव जनावरे चोरी झाल्याची तक्रार कुणीही दिली नसल्याने सरकार पक्षातर्फे प्रदीप बेदरकर यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी अजिंठा ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक अजित विसपुते यांनी दिली.

loading image
go to top