Fee Registration : शुल्क नोंदणीला शाळांची टाळाटाळ; आरटीई, नोंद न केलेल्या शाळांवर कारवाई, विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात
Education Rights : आरटीई अंतर्गत २५ टक्के गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शाळांना प्रतिपूर्ती म्हणून दिला जातो. परंतु, अनेक शाळांनी शुल्क नोंदणीला टाळाटाळ केल्याने शासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर: आरटीई अंतर्गत २५ टक्के गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च शासन ठरावीक दराने शाळांना प्रतिपूर्ती स्वरूपात देते. प्रतीपूर्तीची ही प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी प्रत्येक शाळेने आरटीई पोर्टलवर आपले शुल्क दर नोंदवणे आवश्यक आहे.