
छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळविण्यात सहभागी असलेल्या शिवसेनेतर्फे (यूबीटी) शुक्रवारी पाणी प्रश्नावर ‘हल्लाबोल’ करण्यात आला खरा, पण तो ‘इव्हेंट’सारखाच झाला! या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जाणारे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी रोड ‘शो’ करत शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी आम्हालाच कळवळा असल्याचा आव आणला.