Chh. Sambhajinagar : बिडकीनला बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर १०९८, पोलीस हेल्पलाईन नंबर १०० किंवा पोलीस अधिकारी किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी.
administration succeeded in preventing child marriage in Bidkin
administration succeeded in preventing child marriage in BidkinSakal

- रविंद्र गायकवाड

बिडकिन - पैठण तालुक्यातील बिडकिन येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात होत असलेला सामुहिक विवाह सोहळ्यातील विवाह जिल्हा बालविकास अधिकारी व स्थानिक पोलिस प्रशासन यांच्या वतीने रोखण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,आज दिनांक १०/०९/२०२४ रोजी बाल कल्याण अधिकारी आम्रपाली बोर्डे यांनी श्रीकृष्ण मंगल कार्यालय बिडकीन येथे एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याबाबत माहीती दिली.

अशा प्राप्त माहीती वरून पोउपनि महेश घुगे, सोबत सफौ/निकाळजे, पोहेकों/ साळवे ब.नं.१३८, पोहेकॉ/६७१ मगर व बाल कल्याण अधिकारी श्री. नितेश धुर्वे असे श्रीकृष्ण मंगल कार्यालय बिडकीन येथे गेले असता अल्पवयीन मुलगी रा. बिडकीन हीचा विवाह पाथरदाता ता. नेवासा जि. अहमदनगर येथील मुलासोबत होत असल्याने अल्पवयीन मुलीचे आई वडील,

नवरा मुलगा तसेच त्याचे आई वडील यांना सदर नवरी मुलगी अल्पवयीन ही १८ वर्षाखालील असून सदर अल्पवयीन मुलीचे वय १८ वर्षापर्यंत करू नये व सदर अल्पवयीन मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण होण्याचे अगोदर लग्न केल्यास आपले विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत समज देवून तसे बंधपत्र घेण्यात आले.

व मुलीचे वय १८ वर्षे पुर्ण होई पर्यंत लग्न न करण्याबाबत मुलीचे आई वडील यांना समज देवून जिल्हा बालविकास अधिकारी यांचे मदतीने बालविवाह रोखण्यास बिडकीन पोलीसांना यश आले.

आपल्या आसपास बालविवाह होत असल्यास त्वरित चाईल्ड लाईन नंबर १०९८, पोलीस हेल्पलाईन नंबर १०० किंवा पोलीस अधिकारी किंवा महिला बाल विकास विभागास माहिती देऊन प्रशासनाची मदत करावी.

अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर च्या वतीने करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com