
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित पैठण येथील संतपीठात पाचव्या बॅचसाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पाच प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी शुक्रवारपासून (ता. २५) प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आजपर्यंत ८१६ विद्यार्थ्यांनी संतसाहित्याचा अभ्यास करून प्रमाणपत्र मिळविले आहे, अशी माहिती समन्वयक डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली.