Chh. SambhajiNagar : ‘कोहिनूर’च्या १८ पीजी अभ्यासक्रमांचे प्रवेश स्थगित;विद्यापीठाची कारवाई
PG Admission: खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयातील सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. विद्यापीठ चौकशी समितीच्या अहवालावरून ही कार्यवाही झाली.
छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश या शैक्षणिक वर्षापासून स्थगित करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतला आहे.