Adul Ganesh Mandal Avoids DJ Expenses
esakal
आडूळ, : सार्वजनिक गणेशोत्सव म्हटले की डिजे, ब्रॉड बँड आणि इतर भपकेबाज उपक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, आडूळ येथील हनुमाननगर सार्वजनिक गणेश मंडळाने याला फाटा देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. डिजेचा खर्च टाळून पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन केल्यानंतर वाचलेली ५० हजार रुपयांची रक्कम शाळेच्या शैक्षणिक सुविधेसाठी देत मंडळाने गणेशोत्सवातून समाजोपयोगी संदेश दिला