Child Rights: ‘विद्यादीप’ची मान्यता अखेर रद्द; शासनाचा निर्णय, मुलींच्या पलायनाचे प्रकरण भोवले
Vidhyadeep Case: विद्यादीप बालगृहातील मानसिक छळ व गोपनीयतेच्या उल्लंघनाच्या आरोपांनंतर अखेर शासनाने या बालगृहाची मान्यता रद्द केली आहे. मुलींच्या पलायनाने ही प्रकरणं समोर आली होती.
छत्रपती संभाजीनगर : नऊ मुलींच्या पलायनानंतर, छळ आणि वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी आवाज उठविल्यानंतर राज्यभरात चर्चेत आलेल्या येथील विद्यादीप बालगृहाची मान्यता शासनाने अखेर रद्द केली. तसा निर्णय बुधवारी (ता. १५) जारी केला.