लातूर : बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा करार

पाशा पटेल : नागार्जुना ग्रुपसोबत स्वाक्षऱ्या, तीस हजार लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारणार
Agreement to produce ethanol from bamboo Pasha Patel
Agreement to produce ethanol from bamboo Pasha Patelsakal

लातूर : बांबूपासून ३० हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचा नागार्जुना ग्रुप व लोदगा बांबू इंडस्ट्रीज यांच्यात शुक्रवारी (ता. पाच) हैदराबाद येथे सामंजस्य करार झाला. या करारावर लोदगा बांबू इंडस्ट्रीजच्यावतीने माजी आमदार पाशा पटेल व नागार्जुना ग्रुपच्यावतीने डॉ. बनिब्राता पांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. बांबूपासून रोज तीस हजार लिटर क्षमतेची इथेनॉल निर्मिती करणारी रिफायनरी ही पहिल्यांदाच उभी राहणार आहे, अशी माहिती पटेल यांनी दिली.

पाशा पटेल म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आयआयसी बंगरूळ आणि नागार्जुना ग्रुप मिळून बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे पायलट प्रकल्प उभे करून चाचणी करत होते. या प्रकल्पाला वेळोवेळी भेटी दिल्या. त्यांच्या या प्रकल्पाच्या चाचण्या यशस्वी झाल्याचे दिसून आले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि नागार्जुना ग्रुप यांनी केलेल्या प्रयोगाअंती रोज तीस हजार लिटर क्षमतेची दीडशे टन बांबूपासून ६५ कोटी रुपये गुंतवणुकीमध्ये पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून वार्षिक पंधराशे एकर बांबूमधून हा रिफायनरी प्रकल्प चालवता येऊ शकतो. अशा पद्धतीचे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ. बनिब्रता पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरच्या साह्याने सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.

भारतात सुमारे साडे आठ लाख कोटी रुपयांचे डिझेल आणि पेट्रोलची आयात केली जाते. आता ही आयात न करता केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या सहकाऱ्याने आणि सहकाराचा माध्यमातून संपूर्ण देशभरात बांबूपासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभे राहतील, अशाच तंत्रज्ञानाचा शोध आम्ही गेली अनेक वर्षांपासून घेत असल्याचे ते म्हणाले. नागार्जुना ग्रुप आणि लोदगा बांबू इंडस्ट्रीज यांच्यात शुक्रवारी झालेल्या करारानुसार सुरुवातीला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, बिहार आदी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी एक इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारण्याचे मान्य करण्यात आले आहे, असे पाशा पटेल यांनी सांगितले. कॉलबॅक संस्थेचे संचालक संजीव करपे, जिओ लाइफ अ‍ॅग्रोचे विनोद लाहोटी, तेलंगणाचे शेतकरी रवी पाटील आदी उपस्थित होते.

अमित शहा येणार लोदग्यात

केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा एप्रिलमध्ये लोदग्याला येणार असून, त्यांच्या भेटीदरम्यान नुमिलगड रिफायनरीचे सीएमडी नेदरलँड, फिनलँड, भारत यांच्या सहकाऱ्याने तयार होत असलेल्या रिफायनरीचे तसेच नागार्जुना ग्रुपचे डॉ. बनिब्राता पांडे, फर्टिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लोदगा बांबू इंडस्ट्रीजच्यावतीने बांबूपासून इथेनॉल निर्मितीबाबत सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com