

Sakal Book Festival Ahilyanagar
sakal
अहिल्यानगर : सकाळ पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून अहिल्यानगरकरांना एक पर्वणी उपलब्ध झाली आहे. संस्कारक्षम पिढी घडण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम कौतुकस्पद आहेत. आज सोशल मीडियाचा प्रभाव कितीही वाढू द्या, खरा आनंद पुस्तक वाचनातूनच मिळतो, असे मत सकाळ पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले.
सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सावेडीतील जॉगिंग ट्रॅक मैदानावर गुरुवारी (ता. १९) सकाळ पुस्तक महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले.
आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, नगरसेविका वर्षा सानप, नगरसेवक सुरेश बनसोडे, संपादक संभाजी पाटील, सहसंपादक प्रकाश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले.