AI Powered Pichkari : पिचकारीतही एआय; रंग उडवताना आपोआप लागतील होळीची गाणी
Smart Pichkari : यंदा होळी सणासाठी बाजारात एआयवर चालणारी पिचकारी आली आहे, जी रंग उडवताच होळीची गाणी वाजवते. या अनोख्या पिचकारीमुळे बाजारपेठ सजली आहे आणि ग्राहकांचा उत्साह वाढला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) प्रत्येक क्षेत्रात शिरकाव होत आहे. त्याला आता सर्वांचा आवडता असलेला धूलिवंदनाचा सणही अपवाद राहिला नाही. यंदा बाजारपेठेत नेहमीच्या पिचकाऱ्या आल्या आहेत.