एआय आधारित नवकल्पनांसाठी ‘मॅजिक’तर्फे राष्ट्रीय स्पर्धा

एआय आधारित नवकल्पनांसाठी ‘मॅजिक’तर्फे राष्ट्रीय स्पर्धा
Published on: 
एआय आधारित नवकल्पनांसाठी ‘मॅजिक’तर्फे राष्ट्रीय स्पर्धा --- ‘एआयएमएम २०२६’चे आठवे पर्व; सात लाखांची बक्षिसे, बीजभांडवलाची संधी --- सकाळ वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून औद्योगिक आणि सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्युबेशन कौन्सिलतर्फे (मॅजिक) ‘एआयएमएम २०२६’ ही आठवी राष्ट्रीय नवकल्पना स्पर्धा होणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड मॅनकाइंड’ अशी या स्पर्धेची संकल्पना आहे. स्टार्टअप्स, नवउद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), विद्यार्थी आणि संशोधन पथकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर आहे. उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि समाजासमोरील प्रत्यक्ष समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उपाय शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धेसाठी दोन स्वतंत्र श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या श्रेणीत किमान व्यवहार्य उत्पादन (एमव्हीपी) टप्प्यातील संकल्पना आणि त्यांचे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट सादर करता येतील. दुसऱ्या श्रेणीत प्रत्यक्ष बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या आणि महसूल मिळविणाऱ्या उत्पादनांचा समावेश असेल. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सात लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय पात्र नवकल्पनांना बीजभांडवलासाठी मदत आणि मॅजिकच्या माध्यमातून इनक्युबेशनची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ संकल्पना मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे व्यावसायिक उत्पादन आणि बाजारपेठेतील विस्तार करण्यासाठीही नवउद्योजकांना मदत मिळू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उद्योगांमध्ये वाढविणे, तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि देशाच्या तांत्रिक व आर्थिक विकासाला हातभार लावणारे उपाय विकसित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. --- असा करा अर्ज इच्छुक स्टार्टअप्स, विद्यार्थी, संशोधक आणि एमएसएमईंना स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जाची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२६ असून, अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी https://tinyurl.com/AIMM2026 या लिंकचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.