
महेश देशमुख
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या हवेत सल्फर डायॉक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड्सचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आहे तर हवेतील श्वसन प्रवण दूषित कणांचे प्रमाण निर्धारित मर्यादेच्या तीन ते चार पट अधिक झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीतून समोर आले. त्यामुळे अशा हवेत मोकळा श्वास घेणेही जणू शिक्षा बनले आहे. परिणामी, श्वसनाचे विकार, हृदयरोग आदींचा धोका वाढला.