विमानतळावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांची तपासणी

विमानतळावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधांची तपासणी
Published on
विमानतळावर ज्येष्ठ आणि दिव्यांगांच्या सुविधांची तपासणी यात्री सेवा अभियान ः सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासासाठी पुढाकार छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : येथील विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला सुलभ, सुरक्षित आणि सन्मानजनक सेवा मिळावी या उद्देशाने राबवण्यात येत असलेल्या यात्री सेवा अभियान २०२६ अंतर्गत विशेष तपासणी मोहीम हाती घेतली. या मोहिमेअंतर्गत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि मर्यादित हालचाल क्षमता असलेल्या प्रवाशांसाठीच्या सुलभ स्वच्छतागृहांची (ॲक्सेसिबल टॉयलेट्स) पाहणी सोमवारी (ता. २१) केली. विमानतळावरील दिव्यांग आणि ज्येष्ठ प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पाहणीदरम्यान स्वच्छतागृहांमधील हॅन्ड रेल्स, आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी लागणाऱ्या इमर्जन्सी कॉल बेल्स, स्वयंचलित सरकते दरवाजे (ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर्स), स्वच्छता आणि साबणाची उपलब्धता, आरसे, कचराकुंड्या आणि योग्य प्रकाश व्यवस्था यांसारख्या आवश्यक बाबींची बारकाईने तपासणी संचालक शरद येवले यांच्या मार्गदर्शनात केली. यावेळी टर्मिनल इन्चार्ज वैशाली अंडे, ऑपरेशन मॅनेजर सनी दास यांनी कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. दरम्यान, या सर्व सुविधा व्यवस्थित सुरू आहेत की नाही, स्वच्छता राखली जाते का आणि त्यांचा वापर सहज शक्य आहे का, याची प्रत्यक्ष खात्री करण्यात आली. फलकांची तपासणी ः या अभियानअंतर्गत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दिशादर्शक फलकांची तपासणी केली. प्रवाशांना योग्य दिशादर्शन मिळावे आणि त्यांचा वेळ वाचावा, या उद्देशाने विमानतळ प्रशासनाने ही विशेष मोहीम मंगळवारी (ता. २२) राबवली. या तपासणी मोहिमेदरम्यान प्रवाशांची सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या महत्त्वाच्या भागांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये बोर्डिंग गेट्स, प्रसाधनगृहे, पार्किंग परिसर आणि प्रवाशांच्या सुविधांच्या संबंधित इतर महत्त्वाच्या झोनचा समावेश होता. सर्व प्रमुख दिशादर्शक फलक प्रवाशांना लांबूनही स्पष्ट दिसतात का? आणि त्यावरील दिशांचे निर्देश अचूक आहेत का?, याची बारकाईने पडताळणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com