
वसमत : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन ऑगस्ट रोजी तालुक्यातील बाभुळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात महाआरोग्य शिबिर घेण्यात आले.यावेळी ५ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मराठवाड्यातील आयडॉल प्राथमिक आरोग्य केंद्र बाभुळगावला बनवणार अशी माहिती आमदार राजू नवघरे यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.