माटेगाव हरिनाम सप्ताहास प्रारंभ
---------
ज्ञानेश्वरी पारायणासह विविध कार्यक्रम
पूर्णा, ता.१९ (बातमीदार): तालुक्यातील माटेगाव येथे ५२ वर्षांची परंपरा असलेल्या बारा दिवसीय अखंड हरिनाम सोहळ्यास शनिवारपासून (ता.१९) प्रारंभ झाला. यानिमित्त ३० सप्टेंबरपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भावार्थरामायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सप्ताहात नारायण महाराज टाकळीकर, उत्तमराव बोबडे, रंगनाथ महाराज तारे, विठ्ठलशास्त्री बोबडे, माऊली महाराज जमदाडे, विश्वनाथराव पारवे, त्र्यंबक महाराज दस्तापूरकर, दिगंबर गुरुजी काळे, योगेश महाराज, सुधीर महाराज कोल्हे, ॲड. यादव महाराज डाखोरे यांचे कीर्तन, सटवाजी महाराज सुहागनकर, जगन्नाथ महाराज पाटील, सोपानकाका बोबडे महाराज, दीपक महाराज देशमुख, पांडुरंग भुसारे, भगीरथमहाराज काळे, रमेश महाराज बुचाले, बालासाहेब महाराज गतिर, संभाजी बोबडे यांची कीर्तन व प्रवचन सेवा होणार आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे पूजेचे कीर्तन होणार असून, दुपारी पालखी व दिंडी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री भारत हरी पाटील महाराज यांचे कीर्तन होईल. ३० सप्टेंबर रोजी भारत हरी पाटील महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. सप्ताहात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माटेगाव येथील ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.
-------------