Sambhaji Nagar News : ऑरिकमध्ये ‘अल्ड्रीच’चे पहिले आयटी पार्क,मराठवाड्यातील दोन हजार जणांना मिळणार रोजगार ; मिर्झा बेग

यातून दोन हजार लोकांना रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती ‘अल्ड्रीच’चे मॅनेजिंग पार्टनर मिर्झा बेग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात आयटी पार्क असावेत, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्या अनुषंगाने अमेरिकन ‘अल्ड्रीच’ ही कंपनी ऑरिक सिटीत आठ एकरमध्ये आयटी पार्क उभारणार आहे.

यातून दोन हजार लोकांना रोजगार देण्यात येणार असल्याची माहिती ‘अल्ड्रीच’चे मॅनेजिंग पार्टनर मिर्झा बेग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. शिवाय पाच एकरांत मणका आणि न्यूरॉलॉजी या दोन विकारांवर प्रभावी उपचारासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार असून यासाठी जागेची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी स्थानिक प्रमुख अहमद जलील, अल्ड्रीचची सहयोगी कंपनी हेल्थचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॅन टोरन्स, सीएन वेज, भार्गवी कांची, संजीव, संकेत हे अधिकारी उपस्थित होते. मूळ आष्टीचे (बीड) असलेले मिर्झा बेग आता अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. त्यांच्या जगप्रसिद्ध अल्ड्रीचतर्फे सहा महिन्यांपूर्वीच ऑरिक हॉलमध्ये कार्यालय सुरू केले आहे.

प्रायव्हेट इक्विटी फंडात १२५ जणांच्या टीमच्या माध्यमातून कामही करत पुढे ती ५०० जणांपर्यंत वाढविणार असल्याचेही बेग यांनी सांगितले. कंपनीचे अमेरिका, आफ्रिका आणि फिलिपाईन्स विविध देशांत शाखा आहे. २००५ मध्ये बेग यांनी हैदराबादेत अल्ड्रीचची भारतातील पहिली शाखा सुरू केली. त्यानंतर मुंबई, पुणे आणि आता छत्रपती संभाजीनगरात कंपनीत सुरू केली आहे. जगभरात कंपनीचे चार हजार कर्मचारी कार्यरत आहे.

अशी असेल कंपनी

  • पाच वर्षांत पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित होईल प्रकल्प

  • अल्ड्रीचमध्ये कर्मचाऱ्यांसाठी वर्ल्ड क्लास सुविधा

  • कर्मचाऱ्यांसाठी घरापासून कंपनीपर्यंत

  • वाहनव्यवस्था

  • दिवसभरातून दोन वेळा जेवण

  • मराठवाड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्राधान्य

  • काही विद्यार्थ्यांची आंतरवासीत म्हणून निवड

मराठवाड्यात आयटी क्षेत्रात मोठी गुणवत्ता आहे. पण ती मुंबई, पुणे, बंगळूर यासारख्या मेट्रो शहरांतील आयटीपार्कमध्ये वापरले जात आहे. स्थानिक पातळीवर संधी नसल्याने विद्यार्थी बाहेर जातात. मराठवाड्याचा भूमिपुत्र असल्याने अल्ड्रीचच्या माध्यमातून स्थानिक मुलांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. यासह सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिकल टुरिझमला चालना देण्याचा प्रयत्न राहील.

- मिर्झा बेग, ‘अल्ड्रीच’चे मॅनेजिंग पार्टनर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com