

Party workers discussing strategies amid uncertainty over alliances in Nilanga taluka elections.
Sakal
-राम काळगे
निलंगा : नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्याने राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. अशातच आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या निवडणुका आघाडी पातळीवर लढवल्या जाणार की, प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परिणामी दोन्ही आघाड्यांतील कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.