बँकेतर वित्तीय संस्थांचे विस्तारले जाळे
- वाहन, गृह आणि लघुउद्योग कर्जासाठी विविध पर्यायांचे आकर्षण
- बाराहून अधिक प्रमुख वित्तीय संस्थांचा मार्गदर्शिकेत समावेश
.........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ४ ः जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांच्या वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांसोबतच बँकेतर वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वाहन खरेदी, शेतीसाठी ट्रॅक्टर, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म लघुउद्योगांसाठी लागणारा वित्तपुरवठा आता जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सहजरीत्या उपलब्ध झाला आहे.
नागरिकांना या सर्व सेवांची माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी तब्बल १२ हून अधिक प्रमुख राष्ट्रीय वित्तीय संस्थांचा समावेश असलेली विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. धाराशिव शहरासह उमरगा, भूम, कळंब, तुळजापूर आणि इतर ग्रामीण भागांत या संस्थांच्या शाखा व सेवा कार्यान्वित आहेत.
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संस्थांचे वर्गीकरण वाहन व व्यावसायिक कर्ज, किरकोळ व गृहकर्ज, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म वित्तपुरवठा अशा चार प्रमुख क्षेत्रांमध्ये करण्यात आले आहे.
.........
((पॉईंटर))
वाहन आणि व्यावसायिक कर्ज क्षेत्र
शेती अवजारे, ट्रॅक्टर आणि व्यवसाय विस्तार
- श्रीराम फायनान्स लिमिटेड : व्यावसायिक वाहने, जुनी वाहने, ट्रॅक्टर व व्यवसायासाठी कर्ज (सेवा : धाराशिव शहर, उमरगा, भूम)
- महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस : ट्रॅक्टर, चारचाकी वाहने आणि कृषी उपकरणे (सेवा : धाराशिव शहर, उमरगा)
- चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स : वाहन कर्ज, गृहकर्ज आणि एमएसएमई व्यवसाय कर्ज (शाखा : आनंदनगर, धाराशिव).
- एल अँड टी फायनान्स लिमिटेड : दुचाकी, ट्रॅक्टर आणि सूक्ष्म कर्ज (सेवा : संभाजीनगर परिसर, धाराशिव, कळंब)
- सुंदरम फायनान्स लिमिटेड : व्यावसायिक वाहने आणि मोटार खरेदी (सेवा : धाराशिव शहर)
.......
वैयक्तिक, गृह आणि किरकोळ कर्ज सेवा
- एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस : वैयक्तिक कर्ज व कन्झ्युमर ड्युरेबल्स (सेवा : महात्मा गांधी मार्ग-धाराशिव, कळंब)
- आयआयएफएल फायनान्स : गृहकर्ज, व्यवसाय कर्ज आणि सुवर्ण कर्ज (सेवा : धाराशिव शहर)
- एसएमएफजी इंडिया क्रेडिट : वैयक्तिक व लघुउद्योग कर्ज (धाराशिव)
......
३) सुवर्ण कर्ज (गोल्ड लोन) सेवा
- मुथूट फायनान्स लिमिटेड : इन्स्टंट गोल्ड लोन आणि मनी ट्रान्सफर (धाराशिव शहर, तुळजापूर)
- मुथूट फिनकॉर्प लिमिटेड : सुवर्ण कर्ज, मायक्रोफायनान्स आणि विमा सेवा (धाराशिव शहर, उमरगा)
......
४) सूक्ष्म वित्तपुरवठा (मायक्रोफायनान्स) व ग्रामीण अर्थव्यवस्था
- भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड : महिला बचत गट व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सूक्ष्म कर्ज (सेवा : धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब)
- इक्विटास मायक्रो फायनान्स : लघुउद्योग व स्वयंसहाय्यता गट कर्ज (सेवा : धाराशिव शहर)
- बेरार फायनान्स लिमिटेड : दुचाकी आणि वैयक्तिक कर्ज (धाराशिव)
.......................
((पॉईँटर))
कर्ज घेण्यापूर्वी आरबीआय नोंदणी तपासा
- बँकेतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे.
- आरबीआय नोंदणी : संबंधित संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत आहे का आणि तिच्याकडे वैध प्रमाणपत्र आहे का, याची खातरजमा करा.
- अटी व शर्ती : व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी, परतफेडीचा कालावधी, विलंब शुल्क आणि कर्जवसुलीच्या नियमांची पूर्ण माहिती घेऊनच करारावर स्वाक्षरी करा.
- ॲप्स, फसवणुकीपासून सावध राहा ः कर्जाच्या नावाखाली आधी पैसे मागणारे एजंट, अनाधिकृत मोबाईल ॲप्स आणि संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहा.
- माहितीची गोपनीयता : अर्ज करताना ओटीपी, बँक पिन अथवा अत्यंत गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना शेअर करू नका.
..........................
((कोट))
खूप लोकांचे उत्पन्न कमी असते. आयटीआर किंवा तत्सम कागदपत्रे नसतात. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बॅंका, खासगी बॅंकांमध्ये त्यांना कर्ज मिळत नाही. अशा कमी उत्पन्न गटातील लोकांना या वित्तीय संस्था कर्ज देतात. त्यामुळे गरिबांना लहान-मोठे व्यवसाय करून गरिबीतून बाहेर येण्यास मदत होत आहे. त्यातून जिल्ह्याचाही विकास होत आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त असे कर्जदार असून, त्यांना या फायनान्स कंपन्यांनी सुमारे ५०० कोटींचा वित्त पुरवठा केलेला आहे.
- कुमुद रंजन पांडा, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बॅंक