
अंबड शहर कडकडीत बंद; रामेश्वर खरात खून प्रकरनाचे पडसाद
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील होळकरनगर येथील वीस वर्षीय तरुण रामेश्वर अंकुशराव खरात याला दहा ते पंधरा संशियतानी शुल्क कारणावरून लाकडी दांड्याने व लोखंडी रॉडने मारहाण करून शनिवारी (ता.१२) खून केला. याचे पडसात सोमवारी (ता.१४) अंबड शहरात उमटले असून शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
अंबड शहरातील रामेश्वर खरात याला शुल्क कारणावरून दहा ते पंधरा जणांनी मारहाण केली. यात त्याचा खून झाला. त्यानंतर अंबड तालुका पोलिस ठाण्यात रविवारी(ता.१३)रात्री शेकडो नागरिकांनी ठाहान मांडून दोषींवर गुन्हा नोंद करावा.
तसेच आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. रविवारी रात्री पोलिसांनी सहा ते सात संशियताना ताब्यात घेतले. मात्र, या घटनेची निषेधार्थ सोमवारी शहर बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. या प्रतिसाद देत सोमवारी अंबड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. शिवाय तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन ही देण्यात आले. दरम्यान शहरातील हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद होती. शहरातील चौकाचौकात अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षणनितीन पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Web Title: Ambad City Closed Rameshwar Kharat Murder Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..